दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण जवळपास प्रत्येकाचाच आवडीचा सण आहे. सर्वांनाच दिवाळी हा सण खूप आवडतो. त्यामुळेच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध essay on diwali in marathi लिहिलेला आहे.
दिवाळी वर मराठी निबंध सर्वच विद्यार्थांसाठी खूपच उपयुक्त आहे. माझा आवडता सण दिवाळी निबंध my favourite festival diwali essay in marathi हा तुम्हाला नक्कीच आवडेल.
दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi
दिवाळी वर 10 ओळीचा निबंध | 10 lines on my favourit festival diwali in marathi.
- दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे.
- हा सण इंग्रजी दिनदर्शिका नुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. या सणाची तारीख निश्चित नसते.
- दिवाळीला दीपावली किंवा दीपोत्सव असे देखील म्हटले जाते.
- दिवाळीच्या दिवशी घराची आणि अंगणाची स्वच्छ्ता केली जाते, अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते.
- दिवाळीच्या दिवशी अंगाला उठणे लाऊन अंघोळ करण्याची प्रथा आहे.
- दिवाळीच्या दिवशी अंगणात मातीचे दिवे लावले जातात. त्यामुळे या सणाला प्रकाशाचा सण म्हणून देखील ओळखले जाते.
- दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे भाहुबिज होय. या दिवशी बहीण भावला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रेरणा करते.
- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.
- दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिवू लावले जातात आणि लहान मुले फटाके फोडून आनंद व्यक्त करतात.
- दिवाळीच्या दिवशी लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे आणि गुलाब जमून हे फराळाचे पदार्थ खायला मिळतात. मला दिवाळी हा सण खूप आवडतो.
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi (700+ शब्दात)
भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. भारत देशात संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक , सांस्कृतिक आणि सामाजिक सण उत्सव साजरे केले जातात. यातून सामाजिक बांधिलकी जोपासली जातेच शिवाय लोक मतभेद विसरून एकत्र जमतात.
मला तसे तर हिंदू संस्कृतीमध्ये साजरे केले जाणारे सर्वच सण उत्सव आवडतात पण दिवाळी हा माझा सर्वात जास्त आवडणारा सण आहे. म्हणजेच माझा आवडता सण दिवाळी आहे. या सणाला दिवाळी किंवा दीपावली असे देखील म्हटले जाते. अनेक कवी आणि लेखक दिवाळी या सणाचे वर्णन दीपोत्सव असे देखील करतात. कारण या सणाच्या दिवशी सायंकाळी दिवे लावण्याची प्रथा आहे.
- माझी आजी मराठी निबंध
- माझी शाळा मराठी निबंध
- झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध
दिवाळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा हिंदू सण आहे. हा सण केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मीय लोक देखील साजरा करताना दिसतात. या सणाचे विशेष म्हणजे यातून खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.
दिवाळी (essay on diwali in marathi) हा सण आश्विन या मराठी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिका नुसार दिवाळी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येतो. पण या सणाची तारीख निश्चित नसते. हा सण कधी ऑक्टोबर महिन्यात येतो तर कधी नोव्हेंबर महिन्यात येतो. हा सण भारताबाहेर विदेशात राहणारे हिंदू धर्मीय लोक देखील मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसून येतात.
दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळेला पंधरा ते वीस दिवस सुट्या असतात. तसेच ऑफिस आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील आठ ते दहा दिवस सुट्या असतातच. त्यामुळे घरातील सर्व मंडळी एकत्र असतात. तेंवहापासून दिवाळी सणाच्या तयारीला सुरुवात होते.
गावातील आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि सुंदर किल्ले बनवतो. किल्ले बनवण्यात एक वेगळीच मजा असते. तसेच आम्ही संपूर्ण गावासठी एक मोठा आकाश कंदील तयार करतो. यासाठी आम्हाला गावातील इतर ज्येष्ठ मंडळींची मदत देखील लाभते. नंतर हा आकाशकंदील गावच्या मध्यभागी लावण्यात येतो.
आमच्या घरी देखील मी आणि माझी बहिण मिळून एक छोटा आकाश कंदील बनवतो. आई आणि आत्या फराळाचे पदार्थ बनवण्यात व्यस्त असतात.लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे असे अनेक पदार्थ बनवण्यात येतात. यात सर्वांचे आवडते गुलाब जमून तर मला खूपच आवडतात. दिवाळीच्या अगोदर आम्ही सर्वजण मिळून घराची आणि अंगानाची स्वच्छता करतो.
दिवाळीचा सण (diwali festival essay in marathi) हा तीन किंवा पाच दिवसांचा असतो. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं आणि दुसरं पाणी असतं. तिसऱ्या दिवशी भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन असते.दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला उठणे लावून आंघोळ केली जाते.
घरातील सर्व मंडळी नवीन कपडे परिधान करतात आणि आनंदाने फराळाचे पदार्थ खातात. या दिवशी पाहुण्यांना आणि मित्रांना घरी फराळाला बोलावण्याची प्रथा आहे. लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. घरातील प्रौढ मंडळी लहान चिमुकल्यांना पैसे आणि भेटवस्तू देतात.
ताई अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढते. सायंकाळी अंगणात दिवे लावले जातात. घरातील मंडळी आणि लहान मुले फटाके वाजवून आनंद व्यक्त करतात. फटाके वाजवणे लहान मुलांना खूप जास्त आवडते.
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्य साठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देतो आणि रक्षण करण्याचे शपथ घेतो. त्याचप्रमाणे त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.
- मी शिक्षक झालो तर मराठी निबंध
दिवाळी हा सण खूपच आनंदाचा आणि जल्लोषाचा असतो. यात मनोरंजन तर होतेच आणि समाजातील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. त्यामुळे दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.
टीप: मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दिवाळी वर मराठी निबंध, माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi लिहून दिलेला आहे. हा सण इयत्ता १,२,३,४,५,६,७,८,९,१० पर्यंत कोणत्याही वर्गासाठी तुम्ही वापरू शकता.
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्ही दिवाळीला कश्या प्रकारे मज्जा करता, ते देखील कमेंट करून कळवा, धन्यवाद…!
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
- मुख्य पृष्ठ
- आमच्याबद्दल
- संपर्क साधा
Header Ads Widget
आई म्हणजे जीवनातील एक अनमोल भेट, जी आपल्याला प्रेम,संकल्प आणि मार्गदर्शन देते., ज्यावेळी आपल्याला काही शिकायचं असतं, त्यावेळी वडिलांचा अनुभव साक्षात गुरु असतो., एक खरा मित्र तो आहे, जो आपल्याला चुकत असताना सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतो..
- महापुरुष
- _भारतीय महापुरुष
- __स्वातंत्र्यवीर
- __समाज सुधारक
- __संत आणि धार्मिक व्यक्ती
- __राजकीय नेता
- _महाराष्ट्रातील महापुरुष
- __महाराष्ट्रातील समाज सुधारक
- _विदेशी महापुरुष
- __वैज्ञानिक आणि शोधक
- __संत आणि आध्यात्मिक नेता
- __जागतिक नेते
- मराठी कथा
- _बाल कथा
- _लोक कथा
- _प्रेम कथा
- _प्रेरणादायी कथा
- _ऐतिहासिक कथा
- मराठी कविता
- _प्रेम कविता
- _हास्य कविता
- _प्रेरणादायी कविता
- _बाल कविता
- _आई कविता
- सुविचार
- _जीवन सुविचार
- _प्रेरणादायी सुविचार
- _प्रेम सुविचार
- _आई-बाबा सुविचार
- _मैत्री सुविचार
- चारोळ्या
- _प्रेम चारोळ्या
- _हास्य चारोळ्या
- _प्रेरणादायी चारोळ्या
- _मैत्री चारोळ्या
- उखाणे
- _नवऱ्याचे उखाणे
- _नवरीचे उखाणे
- _विनोदी उखाणे
- आरोग्य
- _आरोग्य टिप्स
- _घरगुती उपाय
- _योग आणि व्यायाम
- _ताण व्यवस्थापन
- शुभेच्छा
- _सणांच्या शुभेच्छा
- __दिवाळी शुभेच्छा
- __नववर्षाच्या शुभेच्छा
- __रक्षाबंधन शुभेच्छा
- __नाताळच्या शुभेच्छा
- _विशेष शुभेच्छा
- __कामगार दिनाच्या शुभेच्छा
- __शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
- __स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
- __प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
- _वाढदिवस शुभेच्छा
- __वडिलांना शुभेच्छा
- __आईला शुभेच्छा
- __नवऱ्याला शुभेच्छा
- __बायकोला शुभेच्छा
- __मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छा
- _लग्नाच्या शुभेच्छा
- कृषी
- _शेती टिप्स
- _शेतकरी योजना
- _गावाच्या गोष्टी
- _पशुपालन
- राजकारण
- _सरकारी योजना
- _सरकारी नोकऱ्या
- _राजकारणाची माहिती
- ब्लॉग
वर्णनात्मक निबंध : माझा आवडता सण - दिवाळी निबंध
वर्णनात्मक निबंध : माझा आवडता सण - दिवाळी निबंध | maza avadta san diwali essay in marathi.
दिवाळी, हा भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रिय सण आहे. प्रत्येक वर्षी हा सण कार्तिक महिन्यात, अर्थातच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये, साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे ‘दीपांचा उत्सव’, जो प्रकाश आणि आनंदाचे प्रतीक आहे. दिवाळीच्या सणाचा उत्साह लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात असतो. हा सण फक्त हिंदू धर्मातच नाही, तर शीख आणि जैन धर्मांमध्येही विशेष महत्त्व राखतो.
दिवाळीची तयारी काही आठवडे आधीच सुरू होते. लोक आपल्या घराची स्वच्छता करतात, नवीन कपडे खरेदी करतात, आणि विविध प्रकारच्या मिठाई आणि फराळाची तयारी करतात. दिवाळीच्या काळात बाजारपेठा सजतात. बाजारात रंगबिरंगी दिवे, कंदील, फटाके, गिफ्ट्स आणि सजावटीचे साहित्य विकले जाते. या काळात बाजारात विशेष गर्दी असते. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी उत्सुक असतो.
दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी असतो. या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. अनेकजण या दिवशी सोने, चांदी किंवा इतर दागदागिने खरेदी करतात. लोक घरात देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी स्वच्छता करतात, ज्यामुळे घरात समृद्धी आणि सुख येते. या दिवशी विशेष मिठाई बनवली जाते, जसे की लाडू, चकली आणि चिवडा.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असतो. या दिवशी भगवान कृष्णाने नरकासूराचा वध केला होता, त्यामुळे या दिवशी विशेष पूजा केली जाते. लोक या दिवशी वाईट गोष्टींना त्यागण्याचा संकल्प करतात. हे आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी महत्त्वाचे आहे.
तिसरा दिवस म्हणजे दिवाळीचा मुख्य दिवस. या दिवशी संध्याकाळी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. घरात दिवे लावले जातात, आणि लक्ष्मी पूजन करण्यात येते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दीप किंवा मेणबत्त्या लावून प्रकाशमय वातावरण तयार केले जाते. देवी लक्ष्मीच्या पूजा साठी सुंदर ठिकाण सजवले जाते, जिथे सर्व सदस्य प्रार्थना करतात.
दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांना गोड पदार्थ देऊन शुभेच्छा देतात. यावेळी मिठाईच्या विविध प्रकारांमध्ये आनंद लुटला जातो. शेजारील मित्र आणि कुटुंबीय एकत्र येऊन फटाक्यांचा आवाज करतात, ज्यामुळे दिवाळीचा उत्सव आणखी रोमांचक बनतो. हा सण एकत्र येण्याचा, प्रेम वाढवण्याचा, आणि आनंद साजरा करण्याचा संधी असतो.
दिवाळीचा चौथा दिवस गोवर्धन पूजा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या दरवाजाच्या बाहेर गोवर्धन पर्वत तयार करून पूजा करतात. या पर्वताचा संदर्भ भगवान कृष्णाच्या गोवर्धन पर्वताच्या कथेशी संबंधित आहे. लोक गोवर्धन पर्वताला शेन्यांनी सजवतात आणि त्यावर विविध पदार्थ ठेवून पूजा करतात.
पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज, जो भाव-बहिणीच्या नातेसंबंधांचे प्रतीक आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला आरती ओवाळते आणि त्याला गिफ्ट देते. या परंपरेत एक अनोखा भावनिक आधार आहे, जो आपल्याला आपल्या नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि एकतेचा अनुभव देतो.
दिवाळी हा सण फक्त एक धार्मिक उत्सव नसून, तो आपल्या जीवनातील सर्व गोष्टींवर प्रकाश टाकतो. हा सण आपल्याला एकत्र येण्याची, प्रेमाने आणि आनंदाने वेळ घालवण्याची संधी देतो. दिवाळीच्या सणामुळे आपल्याला आपल्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या आणि शेजाऱ्यांच्या सोबत साजरा केलेला आनंद मिळतो.
या सणात एक विशेष गोष्ट आहे, जी मला खूप आवडते, ती म्हणजे दिवाळीच्या काळात लोक एकमेकांना गोड गोड पदार्थ देतात. विविध प्रकारचे लाडू, चकली, करंज्या, आणि विशेष मिठाई बनवण्यात येतात. या मिठाईंमुळे सणाचा आनंद आणखी वाढतो.
दिवाळीच्या काळात शाळा आणि कॉलेजमध्ये सुट्टी असते, त्यामुळे मला आणि माझ्या मित्रांना अधिक आनंद मिळतो. दिवाळीच्या सुट्टीत सहलीला जाणे, नातेवाईकांना भेटणे, आणि सणाचा आनंद घेणे, हे सर्व मला खूप आवडते.
संपूर्ण कुटुंबासमवेत दिवाळी साजरा करणे म्हणजे एक अद्भुत अनुभव. दिवाळीच्या काळात आपल्याला एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची संधी मिळते. त्यामुळे, मी प्रत्येक वर्षी या सणाची आतुरतेने वाट पाहतो, कारण दिवाळी म्हणजे प्रेम, आनंद, आणि एकतेचा सण आहे.
अशा प्रकारे, दिवाळी हा माझा आवडता सण आहे, कारण तो मला आणि माझ्या कुटुंबाला एकत्र आणतो, आणि आपल्या सांस्कृतिक परंपरांचे स्मरण करून देतो.
आपल्याला हा निबंध कसा वाटला, हे कृपया कंमेंटमध्ये कळवा!
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या, दिवाळी ग्रीटिंग कार्ड.
- दिवाळी शुभेच्छापत्रे
मराठी निबंध
- १५० मराठी निबंध संग्रह
हा ब्लॉग शोधा
- ऑक्टोबर 2024 7
Editors Choice
आमचे अनुसरण करा, popular posts.
प्रेम कथा : पहिला स्पर्श - प्रेमाच्या पहिल्या अनुभवाची गोड कथा
लोक कथा : चतुर कोल्हा - बुद्धिमत्ता आणि धूर्ततेची कथा
- प्रेम कथा 1
- प्रेरणादायी कथा 1
- बाल कथा 2
- लोक कथा 1
- वर्णनात्मक निबंध 1
M arathi R uchi एक विशेष मराठी ब्लॉग आहे, जो कथा, कविता, सुविचार,महापुरुषांच्या जीवनावर आधारित लेख सादर करतो. आमचा उद्देश मराठी साहित्य आणि संस्कृतीला जिवंत ठेवणे आणि वाचकांना प्रेरणा देणे आहे. अनुभवी लेखक आणि कवींच्या टीमद्वारे विविध विषयांवर अद्वितीय दृष्टिकोन मिळतो. वाचकांच्या अभिप्रायाला महत्त्व देऊन, आम्ही त्यांच्या विचारांना मान्यता देतो. आमच्या ब्लॉगमध्ये वाचनाचे समृद्ध अनुभव मिळविण्यासाठी आपली सहभागी भूमिका महत्त्वाची आहे.
- ऐतिहासिक कथा 1
- मराठी कथा 6
- मराठी निबंध 1
Random Posts
बाल कथा : चतुर काकू - बुद्धिमत्तेची आणि सहकार्याची कथा
बाल कथा : ससा आणि कासवाची गोष्ट- मेहनत, धैर्य आणि गर्व यांच्यातील महत्त्वाची शर्यत
लातूर किल्लारीचा भूकंप - महाराष्ट्राच्या इतिहासातील एक भयंकर आठवण [ ३० सप्टेंबर १९९३ ]
Menu footer widget.
- गोपनीयता धोरण
- अटी आणि शर्ती
- अस्वीकरण
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी: Maza Avadta San Diwali Nibandh in Marathi
Maza Avadta San Diwali Nibandh in Marathi: दिवाळी हा सण माझ्या हृदयाच्या जवळचा आहे. तो केवळ एक सण नसून, एक परंपरा, एक आनंदमय क्षण आणि एक आंतरिक भावना आहे जी मला वर्षभराच्या प्रत्येक थकव्यापासून मुक्त करते. दिवाळीच्या आठवणीनेच माझ्या चेहऱ्यावर एक हसू उमटतं आणि मन प्रसन्न होतं. या सणाचं महत्त्व केवळ धार्मिकच नाही, तर कौटुंबिक आणि सामाजिक एकत्रिकरणाचं देखील आहे.
दिवाळीला ‘प्रकाशाचा सण’ म्हणून ओळखलं जातं. या सणाच्या दिवशी सर्वत्र दीपमालिकांची सजावट केली जाते. घराच्या अंगणात, दारात आणि खिडक्यांमध्ये दिवे लावले जातात. हे दीपकेवल तेलाचे किंवा विद्युत नसतात; ते आमच्या मनातील सर्व प्रकारच्या अंधारावर विजय मिळवणाऱ्या आशेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक असतात.
दिवाळीची तयारी खूप आधीपासूनच सुरु होते. घराघरांत साफसफाई, नवी खरेदी, रंगरंगोटी यांचे दृश्य पाहायला मिळते. माझ्या घरी देखील हळूहळू तयारीला सुरुवात होते. आई घराची स्वच्छता करते, बाबा बाजारातून नवे कपडे आणि सजावटीचे सामान आणतात, आणि मी व माझी बहीण रांगोळीची तयारी करतो. अंगणात सुंदर रांगोळी काढताना त्या रंगांतून एक प्रकारचं समाधान मिळतं.
दिवाळीतील गोड पदार्थांनाही एक खास स्थान आहे. लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळे अशा विविध पदार्थांचा खमंग सुगंध घरभर दरवळतो. आईबाबा आणि कुटुंबातील सगळे मिळून फराळ बनवतात. त्या गोडधोडात आईचं कष्ट, प्रेम आणि आपुलकी ओतलेली असते. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन फराळाचा आनंद घेतो, त्यात एक वेगळीच मजा असते.
माझे आवडते पर्यटन स्थळ मराठी निबंध | Majhe aavadte paryatan sthal marathi nibandh पुस्तक बोलू लागले तर निबंध मराठी: Pustak Bolu Lagle Tar Marathi Nibandh
लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. या दिवशी सगळ्या घरांमध्ये लक्ष्मी मातेची पूजा होते. घरात लक्ष्मीमातेचं आगमन व्हावं, सुख-समृद्धी नांदावी म्हणून सगळे आपापल्या कुटुंबांसह पूजेत सहभागी होतात. नवा कपडा परिधान करून, आईच्या हातचं प्रसाद ग्रहण करणं म्हणजे एक खास आनंद मिळतो. हा पूजाविधी आमच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहे.
दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्याची मजा वेगळीच असते. सर्व मित्रमंडळी, शेजारी आणि कुटुंबीय एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करतात. जरी फटाके फोडताना वातावरणाच्या प्रदूषणाची जाणीव असते, तरी आजकाल आम्ही प्रकाशफटाक्यांचा अधिक वापर करतो जेणेकरून निसर्गावर ताण येणार नाही.
दिवाळी हा सण केवळ प्रकाशाचा नाही, तर माणसांच्या हृदयातला आनंद आणि ममतेचा प्रकाश उजळवतो. या सणामुळे मी आणि माझ्या कुटुंबाच्या नात्यातील प्रेम आणि आपुलकी अधिक दृढ होते. मी दरवर्षी या सणाची आतुरतेने वाट पाहतो, कारण दिवाळीचे दिवस हे माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाचे असतात. याच दिवाळीत नवे स्वप्नं, नव्या आशा आणि आनंदाच्या नवनवीन रंगांची उधळण होते.
दिवाळी हा माझा आवडता सण आहे कारण त्यात आपले कुटुंब, आपले मित्र आणि समाज एकत्र येतात. दिवाळी हा सण मला शिकवतो की, कितीही अंधार असला तरी, एका छोट्याशा दिव्याने सगळा अंधार दूर होऊ शकतो.
1. दिवाळी का साजरी केली जाते?
दिवाळी हा सण प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत परतण्याच्या आनंदानिमित्त साजरा केला जातो. तो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक आहे.
2. दिवाळीमध्ये कोणते प्रमुख सण साजरे केले जातात?
दिवाळीत नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे प्रमुख सण साजरे केले जातात.
3. दिवाळीमध्ये कोणते पारंपारिक पदार्थ बनवले जातात?
लाडू, चिवडा, करंजी, शंकरपाळे आणि चकली हे पारंपारिक दिवाळीचे पदार्थ आहेत, जे गोडधोड आणि खारट स्वादांनी भरलेले असतात.
4. दिवाळीची सजावट का केली जाते?
दिवाळीमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दीप लावले जातात, ज्यामुळे अंधार दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते.
5. दिवाळीचे तुम्हाला काय विशेष वाटते?
दिवाळी मला सर्वात आवडते कारण ती कुटुंब, आनंद आणि प्रकाशाचा सण आहे, ज्यामध्ये सर्वांमध्ये प्रेम आणि एकता फुलवली जाते.
3 thoughts on “माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी: Maza Avadta San Diwali Nibandh in Marathi”
- Pingback: Swatantrata ka Arth Likhen: स्वतंत्रता का अर्थ लिखिए
- Pingback: निसर्ग माझा सोबती निबंध: Nisarg Majha Sobati Marathi Nibandh
- Pingback: आंतरराष्ट्रीय योग दिवस मराठी निबंध: International Yoga Day Marathi Nibandh
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
IMAGES
VIDEO